देवळा/नांदगाव : शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी नियमित बाजाराच्या देवळा व नांदगाव येथे जागा बदलण्यात आल्या.नगर परिषद कार्यालयासमोर व व्ही.जे. हायस्कूल नांदगाव येथे फळांची दुकाने, भाजीपाला दुकाने आदी अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी निश्चित केलेल्या जागात दुकानांमध्ये एक मीटर तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक मीटर असे अंतर आखून देण्यात आले असून, या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आलेले आहे.विविध वस्तूंच्या विक्रीच्या वेळा दैनिक भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोरील मैदान व व्ही. जे. हायस्कूल मैदान. किराणा माल/धान्य मसाला विक्रेते दररोज सकाळी ८ ते ११ वा. पर्यंत, तात्पुरते दूध विक्री व बेकरीचे विक्र ी सकाळी ७ ते १० वा. पर्यंत व संध्याकाळी ६ ते ८ वा. पर्यंत संध्याकाळी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. व दवाखाने, मेडिकल इ. ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही अशा निशाण्या करून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
देवळा, नांदगावी भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 8:48 PM
देवळा/नांदगाव : शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी नियमित बाजाराच्या देवळा व नांदगाव येथे जागा बदलण्यात आल्या.
ठळक मुद्देनियमांचे पालन करण्याचे आवाहन