ढील दे दे....दे दे रे भैय्या..., नाशकात पतंगोत्सवाला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 04:51 PM2018-01-14T16:51:28+5:302018-01-14T16:52:38+5:30
गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ......निमित्त संक्रांतीचे.... ....पतंग काटली तर मोठ्याने होणारा काटे ....काटेचा होणारा सामूहिक जल्लोष, यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...!
-दत्ता महाले
येवला- गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ......निमित्त संक्रांतीचे.... ....पतंग काटली तर मोठ्याने होणारा काटे ....काटेचा होणारा सामूहिक जल्लोष, यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...! असे म्हणणारी मुले...... येवल्याच्या सुप्रसिद्ध हलकडी, बॅडचा आवाज यामुळे सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरणात, निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहान मोठ्या आकाराच्या पतंगांनी सजलेले मनमोहक दृष्य येवला शहराच्या आकाशात शनिवारी दिसले.
केवळ लहान मुले, युवक, मध्यमवयीन व वृद्धासह महिलाही मोठ्या उत्साहाने पतंग उडवित होत्या. संक्रांत म्हटली कि येवल्यात एक नवा उत्साह संचारतो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळपासच्या सर्व राज्यात येवला पतंग उडविणे व त्याची मजा लुटण्याच्या बाबतीत येवला सुप्रसिद्ध आहे..मकरसंक्रांत उत्सव त्याआधीचा भोगीचा व त्यानंतरचा दिवस करीचा असे 3 दिवस शहरातील सर्वच व्यवसाय ठप्प असतात. संपूर्ण कापड पेठेत अघोषित संचारबंदी असते. धडपड मंच,खटपट मंच,जय बजरंग फ्रेंडस सर्कल,मधली गल्ली येथे फडकणारे 12 फड्कीचे आकर्षक पतंग दिमाखाने फडकत नववर्षासह मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाचे चित्र शहरवासिय संक्रांतीला पाहत आहे. आबालवृद्ध भान हरपून पतंग उडवितात चहापाणी,नाश्ता जेवण,सर्व काही आपापल्या धाब्यावर व गच्चीवरच असते. पतंग शौकिनांनी पतंग उडविण्याचा आनंद आज लुटत आहेत. आणि संक्रांतीच्या करीला अर्थात सोमवारी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणावर फॅन्सी फटक्याची आतिषबाजी अनुभवयास मिळणार आहे.