मनविसेचा विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:53 PM2017-11-28T23:53:09+5:302017-11-29T00:30:09+5:30
महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फेºयांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, तातडीने बसफेºयांची कपात थांबवावी, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आगारातील विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजीने कार्यालय दणाणून सोडले.
नाशिक : महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फेºयांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, तातडीने बसफेºयांची कपात थांबवावी, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आगारातील विभाग नियंत्रकांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजीने कार्यालय दणाणून सोडले. एकीकडे महामंडळाच्या नाशिक परिवहन विभागाकडून शहर वाहतुकीच्या बसफेºयांमध्ये कपात केली जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून मासिक सवलतीचे प्रवास पासचे दर आकारले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पैसे भरूनही बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामंडळाने तातडीने विविध शाळा-महाविद्यालयांच्या मार्गावरील बसफेºया मुबलक प्रमाणात सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी, या मागणीसाठी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी एन. डी. पटेल रस्त्यावरील आगारातील विभाग नियंत्रकांच्या कार्यालयावर मंगळवारी (दि.२८) हल्लाबोल केला. हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणा देत आगारात प्रवेश केला. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या बसेसवर चढून काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
...अन् कार्यकर्ते झाले आक्रमक
विभाग नियंत्रक शहराबाहेर दौºयावर असल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्त्यांनी आगारामध्ये उभ्या असलेल्या बसेसवर चढून आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजी करत परिवहन मंत्र्यांसह विभाग नियंत्रकांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदविला. विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या दिला.
‘खुर्चीला निवेदन चिकटवू नका’
कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटविण्याची तयारी सुरू करताच वाहतूक अधीक्षक दालनात आले. ‘थांबा, निवेदन मी स्वीकारत आहे, खुर्चीला चिकटवू नका...’ असे सांगून कार्यकर्त्यांना शांत केले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, संदीप भवर, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, दीपक चव्हाण, कौशल पाटील, तुषार भंदुरे आदींच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. येत्या दोन दिवसात पुन्हा शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.