जायगाव ते सप्तश्रृंगी गड पदयात्रेचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:43 PM2018-10-21T17:43:21+5:302018-10-21T17:43:39+5:30
नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले.
नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले. कै. हरिभाऊ दिघोळे यांनी सुरु केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा २१ वे वर्ष आहे.
रविवारी सकाळी सहा वाजता जायगाव येथे सरपंच नलिनी गिते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडी सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेचे सप्तश्रृंगी गडाकडे प्रस्थान झाले. सरपंच गिते यांनी भाविकांसाठी टीशर्ट तर पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे.
सकाळी सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव, मापारवाडी, नायगाव आदि गावांतून अनेक पायी दिंड्याचे गडाच्या दिशेने प्रस्थान झाले. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फूलून गेला होता. देवीच्या नावाने घोषणा देत व जयजयकार करीत जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. पायी दिंडी सोहळ्यात भिमा गिते, महेंद्र सांगळे, गोविंद दिघोळे, भानूदास काकड, संतोष दिघोळे, सचिन गिते, भाऊसाहेब केदार, रमेश आव्हाड, सुरेश गायकवाड, महेंद्र सांगळे, देविदास खाडे, जयराम गामणे, सुरेश गायकवाड, सुरेश हुल्लारे, सोमनाथ चेवले, सदाशिव गायकवाड, अतुल गिते, लक्ष्मण केदार, मारुती बर्के, आदींसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले.