ओझर : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न कंपनी असलेल्या एचएएलच्या बाबतीत नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घोषणा न केल्याने एचएएल कामगारांमध्ये अस्वस्थता बघावयास मिळत आहे. एचएएलकडे केवळ सहा महिने पुरेल एवढेच काम असल्याने पंतप्रधान या प्रकल्पाबाबत काही घोषणा करण्याची अपेक्षा होती पण ती फोल ठरली.गेल्या वर्षभरापासून एचएएल नियोजित वर्कलोड आणि भविष्यातील कामाबाबत झगडत असताना गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आंदोलनाची धार कामगारांनी तीव्र केली होती, त्यामुळे पिंपळगावी सभेसाठी आलेल्या नरेंद्र मोदींनी त्याला भाषणाचा मुद्दा बनवित कामगारांच्या आशा पल्लवित केल्या.नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हबची स्थापना १७ जानेवारीला केली गेली. लघु आणि मध्यम कंपन्यांना सदरचे हब फायद्याचे ठरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि एचएएल कामगारांनी आंदोलन अधिक तीव्र केले. पिंपळगावी आलेल्या पंतप्रधानांनी एचएएलची ताकद दुपटीने वाढविण्याचे आश्वासन दिले तसेच नवीन वेतन कराराबाबतदेखील कामगार सकारात्मक होते.२२निवडणुकीनंतर मात्र मोदी सरकारने अद्याप एचएएलच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने एचएएलच्या भवितव्याबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नरेंद्र मोदी नाशकात आले. त्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवत डिफेन्स इनोव्हेशन हबला महत्त्व देत एचएएल ला साइडट्रॅक केले, यामुळे हजारो कामगारांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. यात संरक्षण खात्याशी निगडित वेगवेगळ्या विभागाला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली जाणार आहे.इन्फो:डिफेन्स हबचा फायदा किती?सहा महिन्यांच्या अंतराने दोन सभा घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाबरोबर संरक्षण खाते किती बळकट होत आहे हे अधोरेखित केले; परंतु आता केवळ सहा महिने पुरेल इतकेच काम एचएएलकडे असल्याने एप्रिलच्या सभेत दहा वर्षांचा दिलेला शब्द अद्याप पूर्ण झालेला नाही. गुरुवारच्या सभेत डिफेन्स इनोव्हेशन हबला भाषणात स्थान दिले गेल्याने त्याचा कितपत लाभ एचएएलला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एचएएल कामगारांच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:13 AM
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न कंपनी असलेल्या एचएएलच्या बाबतीत नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घोषणा न केल्याने एचएएल कामगारांमध्ये अस्वस्थता बघावयास मिळत आहे. एचएएलकडे केवळ सहा महिने पुरेल एवढेच काम असल्याने पंतप्रधान या प्रकल्पाबाबत काही घोषणा करण्याची अपेक्षा होती पण ती फोल ठरली.
ठळक मुद्देडिफेन्स इनोव्हेशन हबचा पुनरु च्चार