नांदगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्यावतीने किसन सभेच्या माध्यमातून भरपावसात शुक्रवारी (दि.२०) येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील तालुका कृषी व तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हा संघटक काॅ. राजन क्षीरसागर, काॅ. विजय दराडे, देवीदास भोपळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. तहसीलदार उदय कुलकर्णी बैठकीसाठी नाशिकला गेले असल्याने जमाबंदी अव्वल कारकून बी. एम. नरोटे, यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले तर तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याकडे चोवीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज पुन्हा सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ खरीप हंगाममध्ये विविध पिकांचे भारती एक्सा पीक विमा कंपनीकडे पीक विमा रक्कम भरलेली आहे. सन २०२०-२१ खरीप हंगामामध्ये सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग कृषी विभाग व पंचायत समिती विभागामार्फत पीक पंचनामा पहाणी अहवाल तयार केला. त्या पीक पंचनामा अहवालामध्ये नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाल्याचा पंचनामा महाराष्ट्र शासनाला कळविण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नांदगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये नुकसानभरपाई दिली.ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे भरून पीक विमा भारत एक्सा कंपनीकडे काढलेला आहे. त्या शेतकऱ्यांचे १०० टक्के पिकांचे नुकसान झालेले असतानाही भारती एक्सा पीक विमा कंपनीने संपूर्ण शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी नितीन सावंत , देवीदास भोपळे, गणेश गंधाक्षे, शेखर पगार, शांताराम पवार, राणू साबळे, गोरख फोडसे, दिनकर यमगर, सुरेश दराडे, सखाराम विंचु, अशोक काकड, भाऊसाहेब सानप, मधुकर आव्हाड, रामभाऊ हेंबाडे, नाना गिते, भागा हालवर, दगु नागरे, पप्पू आहिरे यासह शेतकरी उपस्थित होते.
इन्फो
विमा कंपनीवर कारवाईची मागणी
भारती एक्सा कंपनीने नांदगाव तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा रक्कम खात्यावर वर्ग करावी व केंद्र सरकारच्या अधिकारात असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा कंपन्यांवर अंकुश ठेऊन शेतकरी हितासाठी भारती एक्सा पीक विमा कंपनीवर कारवाई करावी व शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी. अन्यथा या पुढील काळात केंद्र सरकार व भारती एक्सा पीक विमा कंपनीच्या विरोधात अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व पीक विमा कंपनी नाशिक कार्यालयासमोर करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
फोटो -२० किसान सभा/१
नांदगाव पहिल्या छायाचित्रात किसन सभेच्या वतीने भरपावसात काढण्यात आलेला मोर्चा.
नांदगाव येथे जमाबंदी अव्वल कारकून बी एम नरोटे यांना निवेदन देताना राजन क्षीरसागर, काॅ. विजय दराडे देवीदास भोपळे यांच्यासह किसन सभेचे कार्यकर्ते.
200821\20nsk_20_20082021_13.jpg~200821\20nsk_21_20082021_13.jpg
फोटो -२० किसान सभा/१नांदगाव पहिल्या छायाचित्रात किसन सभेच्या वतीने भरपावसात काढण्यात आलेला मोर्चा.~फोटो -२० किसान सभा/१नांदगाव पहिल्या छायाचित्रात किसन सभेच्या वतीने भरपावसात काढण्यात आलेला मोर्चा.