मालेगाव येथे वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:06+5:302021-02-05T05:50:06+5:30
मालेगाव : दिल्ली व राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयाच्या ...
मालेगाव : दिल्ली व राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय किसान बाग धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले. केंद्र शासनाने लादलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, आंदोलनकाळात शेतकऱ्यांवर पोलिसांकडून केलेला अन्यायाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रदेश सदस्य शमीभाताई पाटील, चेतन गांगुर्डे, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिल आहिरे, महासचिव संजय जगताप, जितरत्न पटाईत, शांताराम सोनवणे, युवराज वाघ, राजेंद्र पवार, मुकेश खैरणार, मनोज अहिरे, राजू धिवरे, सुनील अहिरे, शशी पवार, योगेश निकम, सिद्धार्थ उशीरे, मिमोह अहिरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.