नाशिक : शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या आंतरशालेय जलतरण स्पर्धाच स्थगित कराव्या लागल्या आहेत.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच अन्य धरणात पुरेसा साठा नाही, त्याचप्रमाणे पावसाने ओढ दिली अशा स्थितीत महापालिकेने पाणीकपातीची अपरिहार्यता व्यक्त केली आणि गेल्या ३० जूनपासून शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर शहरातील २२१ ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. यात उद्यान विभागाचा ठीक, परंतु महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तरणतलावांवर नियमित सरावासाठी जाणाºया नागरिक आणि युवकांची गैरसोय होत आहे.अनेकांनी तर महापालिकेकडून नियमित पैसे भरून पास घेतले आहेत. परंतु त्यांनादेखील पोहण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्तकेली आहे. विशेष म्हणजेच शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने दि. ४ व ५ जुलैस आंतरशालेय जलतरण स्पर्धा होत्या त्याची तयारी सुरू झाली होती. परंतु टंचाईच्या नावाखाली जलतरण तलाव बंद करण्यात आल्याने या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय सर्रास सुरूपाणीकपात आहे म्हणून जलतरण तलाव बंद करण्यात आल्याचे प्रशासन सांगत असले तरी शहरातील अनेक तारांकित हॉटेल्स तसेच मोठ्या लक्झरियस गृहनिर्माण संस्थांमध्ये तरणतलाव सुरूच आहेत. सर्व्हिस स्टेशन्स तसेच महापालिकेच्या नळजोडणीतून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे उद्योगदेखील सर्रास सुरू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनपाकडून पाण्याची गळती ही चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर धरणातून होणाºया पाण्याच्या उपशापैकी १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा प्रतिदिन हिशेबच लागत नाही. त्यामुळे त्यात लक्ष घालणे सोडून केवळ तरणतलाव बंद करून काय होणार, असा प्रश्न जाणकार करीत आहेत.शहरातील पाण्याची गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय झाली आहे.महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावासह एकूण सात तरणतलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.सावरकर तरणतलावाला वीस हजार लिटर्स पाणी रोज लागते. इतके पाणी वीस फ्लॅट्सला रोज लागते. तरण तलावात रोज हजारो नागरिक पोहण्यासाठी येतात. महापालिकेनेच हे तरणतलाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधले असून, त्याचा सर्वसामान्य नागरिकच वापर करतात. त्यामुळे महापालिकेने योग्य तो विचार करावा.- अरुण काबरे, वास्तुविशारद
पाणीटंचाईचे निमित्त करून जलतरण तलावांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:05 AM