देशमाने शाळेत भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:01 PM2020-01-13T23:01:36+5:302020-01-14T01:20:04+5:30

दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली.

Deshman has a market full of schools | देशमाने शाळेत भरला बाजार

देशमाने प्राथमिक केंद्र शाळेत चिमुकल्यांनी भरविलेल्या आठवडे बाजारात पालक, नागरिकांनी केलेली गर्दी.

Next

देशमाने : दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली.
या बालआनंद मेळाव्याचे उद््घाटन शा.व्य.स. अध्यक्ष गणेश दुघड व केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे यांनी केले. भेळभत्ता, कटलरी वस्तू, शालेय उपयोगी वस्तू, पोहे, चहा, पाणीपुरी या खाद्यपदार्थांचे स्टॉल, भाजीपाला, फळे यांची दुकाने लावले. बघता बघता गावातील ग्रामस्थ व पालकांनी बाजारात गर्दी केली. प्रत्यक्ष व्यवहारात गणिताचे उपयोजन व कौशल्य विकास करण्यासाठी हा उपक्र म घेण्यात आला. या बाजारात सुमारे साडेतीन हजार रु पयांची उलाढाल झाली. शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झालेल्या नफा तोट्याचा आढावा घेतला. गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे व विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी उपक्र माचे कौतुक केले. मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, उपशिक्षक अनिल महाजन, संजय सोनवणे, दादासाहेब बोराडे, सुनील मखरे, शंकर विधाते, जिजा जावळे, मनीषा खैरनार, अरु ण पवार व विद्यार्थ्यांनी उपक्र माचे संयोजन केले.

Web Title: Deshman has a market full of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.