इगतपुरी तालुक्यात बाप-लेकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:57 AM2019-11-30T11:57:28+5:302019-11-30T11:57:37+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे शुक्र वारी रात्री दीडच्या सुमारास बाप आणि लेकाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

 Desperate murder of father and daughter in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात बाप-लेकाचा निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यात बाप-लेकाचा निर्घृण खून

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे शुक्र वारी रात्री दीडच्या सुमारास बाप आणि लेकाचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. वाडीव-हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्य वेगाने सुरू केले आहे. काशीराम वामन फोकणे (६५), ज्ञानेश्वर काशीराम फोकणे (४८) अशी बापलेकाची नावे आहेत. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. पोलिसांकडून घटनेबाबत सोपस्कार पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द या अत्यंत छोट्या गावी ज्ञानेश्वर काशीराम फोकणे हे पत्नी आणि तीन मुलगे यांच्यासह राहत होते. मळ्यात त्यांची शेती असून वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे. दररोज आपल्या वडिलांना जेवण घेऊन कोणी ना कोणी मळ्यात येत असत. शुक्र वारी रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले होते. मात्र रात्री दीडच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी मळ्यात हल्ला करून खून केला. यावेळी त्यांचे वडील काशीराम फोकणे यांचाही निर्घृण खून झाला. ही घटना मळ्यातील घरात घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. वाडीववºहे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. घटनेच्या कारणांचा आणि अज्ञात व्यक्तींच्या शोधाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा पदाधिकारी होते. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

Web Title:  Desperate murder of father and daughter in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक