सत्तेत नसूनही राष्ट्रवादीने कमाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:35 AM2019-10-26T01:35:40+5:302019-10-26T01:36:04+5:30
वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे.
वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे. जिल्ह्यात नऊ जागा लढविणाऱ्या राष्टÑवादीने यंदाच्या निवडणुकीत राजकीय सामंजस्यपणाची व योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची खेळलेल्या खेळीमुळे पक्षाला सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळविता आला आहे.
२००९ निवडणुकीचा फॉर्म्युला वापरून राष्टÑवादीने कॉँग्रेससाठी सहा जागा सोडल्या असल्या तरी, मालेगाव बाह्य ही हक्काची जागा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना सोडून राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊन भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले. त्याचबरोबर नेहमीच पराभव होणाºया देवळाली मतदारसंघात ऐनवेळी भाजपच्या नगरसेविकेस गळाला लावून बबन घोलप यांच्यासमोर नुसते आव्हानच उभे केले नाही तर थेट तीस वर्षांनंतर मतदारसंघ राष्टÑवादीच्या अमलाखाली आणला. सिन्नर मतदारसंघात सक्षम उमेदवाराची वानवा असताना भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेऊन सिन्नरची जागा ताब्यात घेतली. निफाडमध्ये पुन्हा दिलीप बनकर यांनाच उमेदवारी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजी मारली, तर दिंडोरीतही नरहरी झिरवाळ यांनी पाच वर्षे केलल्या कामाच्या बळावर मतदारसंघ कायम राखला.