यावेळी डॉ. धोंडगे म्हणाले की, पाचोळा ही कादंबरी ग्रामीण भागातील अनुभव अधोरेखित करत ग्रामीण व्यवसायाच्या दुरवस्थेमुळे झालेली हलाखीची स्थिती व्यक्त करते. मराठवाडी बोली त्या कादंबरीतून प्रकट करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील व्यक्तिरेखा स्पष्ट करीत प्रसंगांची चर्चा केली. या कादंबरीची इतर भाषेत भाषांतरे झालेली असल्याचेही धोंडगे यांनी नमूद केले.
यावेळी पाचोळा या कादंबरीवर स्वत: लेखक डॉ. रा. रं. बोराडे म्हणाले की, एकदा साहित्यकृती लेखकाने निर्माण केल्यानंतर ती त्याची राहत नाही, ती सर्वांची होते. लेखकाने आपल्या पुस्तकाच्या प्रेमात राहू नये. पुस्तकाची निर्मिती झाली की ते वाचकांचे, समीक्षकांचे होते. वाचक आणि समीक्षक कसे स्वागत करतात ते तटस्थपणे अनुभवावे. खेड्यातील विविध स्तरांवरची स्थित्यंतरे पाहिलेली असल्यानेच ही पाचोळा कादंबरी निर्माण झाली. पाचोळाच्या कथेत विविध प्रकारचे भाष्य, अहंकार, संघर्ष, भावना, सारे काही दिसत असल्याचे बोराडे यांनी नमूद केले. प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव डॉ.प्रा. वेदश्री थिगळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहसचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केला.
फोटो
०५धोंडगे
०५बोराडे