तोतया वीज कर्मचाºयांनी केली दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:31 PM2018-02-18T22:31:40+5:302018-02-18T22:36:38+5:30
नाशिक : तुम्ही वीजबिल भरलेले नाही, बिल दाखवा, घरातील विजेचे पॉइंट दाखवा, अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचाºयांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजन असलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशाप्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्याविहार कॉलनी, गुरुद्वाराच्या पाठीमागे अलका नारायण धिवरे (७५) यांचा अरुणविहार बंगला आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धिवरे या घरी एकट्याच होत्या़ त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी पुरुष घरी आले व त्यांनी एमएसईबीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तुम्ही बिल भरलेले नाही, तुम्ही भरलेल्या बिलाची पावती दाखवा, तसेच हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगितले़ यानंतर धिवरे यांनी त्यांच्या हातातील १ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून त्या कपाटातील पर्समध्ये ठेवल्या होत्या़
तोतया एमएसईबी कर्मचाºयांपैकी एकजण घरातील विजेचे पॉइंट दाखविण्याच्या नावाखाली वृद्ध महिला धिवरे यांना घराच्या गच्चीवर घेऊन गेला तर खाली असलेल्या दुसºया तोतया कर्मचाºयाने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या़ या प्रकरणी धिवरे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात या दोघा तोतयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांत तीन घटनापंचवटीतील भक्तिधामजवळील तुलसी श्याम अपार्टमेंट येथील जयश्री दिलीप जोशी (६०) यांच्या घरी गुरुवारी (दि़ १५) दुपारी दोन संशयित मीटर रिडिंग घेण्याच्या बहाण्याने घरी गेले़
या ठिकाणी विजेचे पॉइंट पाहण्याच्या बहाण्याने जोशी यांचे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले़
दिंडोरीरोडवरील अमृतकुंभ सोसायटीत राहणाºया नव्वद वर्षीय महिलेस जनगणनेच्या कामासाठी आल्याचे सांगून दोन संशयितांनी घरातील पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़
४उपनगरची धिवरे यांची या प्रकारची तोतया एमएसइबी कर्मचाºयांनी फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे़