घरफोडीच्या इराद्याने फिरणारा सराईत ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:38 AM2019-07-14T01:38:57+5:302019-07-14T01:39:42+5:30
चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक : चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन रामसिंग गुरखा (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) याला लोखंडी कटावणी, किल्ल्यांच्या जुडग्यासह पोलिसांनी अटक केली. पवन गुरखा हा सराईत गुन्हेगार असून, मध्यरात्रीच्या सुमारास महात्मानगर भागात तो जबरी चोरी करण्याच्या तयारीने फिरत होता. त्याचवेळी पोलीस नाईक दत्तू हरी गायकवाड हे गस्तीवर असताना त्याच्या संशयास्पद हालचालींवरून गायकवाड यांनी गुरख्यास शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकणी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात पोलीस गस्त अधिक वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गुरखाविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून, हा चोरी करणाºया टोळीचा सदस्य असल्याची खात्री पोलिसांनी पटविली आहे. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.