शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

विकसन परवानग्या मिळणार आॅनलाइन

By admin | Published: October 14, 2016 12:28 AM

स्थायीची मंजुरी : येत्या सहा महिन्यांत प्रणाली कार्यान्वित

 नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात आता विविध विकसन परवानग्या घेण्यासाठी खेटा घालण्याची वेळ येणार नाही, ना अग्निशमन विभागाकडे ना हरकत दाखल्यासाठी छळवणूक होणार. नगररचना विभागामार्फत विविध विकसन परवानग्या आॅनलाइन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत आॅनलाइन संगणकीय कार्यप्रणाली कार्यान्वित होऊन नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे.नगररचना विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध विकसन परवानग्यांकरिता आॅनलाइन संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम पुणे येथील मे. सॉफ्टटेक इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड यांच्याकडून करून घेण्यासाठी एक कोटी ३३ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी समितीने सदर प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता दिली. या प्रस्तावानुसार, येत्या काळात इमारत आराखडा मंजुरीकरिता अर्ज व नकाशे आॅनलाइन सादर करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. आॅनलाइन नकाशा सादर झाल्यानंतर सदर नकाशाची संगणकीय कार्यप्रणालीद्वारे तपासणी होऊन सदर बांधकाम परवानगीसाठी सादर करण्यात आलेला नकाशा हा नियमानुसार आहे किंवा नाही याबाबतचा छाननी अहवाल त्वरित प्राप्त होणार आहे. सादर करण्यात आलेल्या नकाशाचे फ्लोअर एरिया कॅल्क्युलेशन व एफएसआयबाबतची तपासणीही संगणकीय कार्यप्रणालीद्वारे शक्य होणार आहे. इमारत आराखडा मंजुरी प्रस्तावाच्या प्रत्येक टप्प्याची माहितीची उपलब्धता होणार आहे. अर्जदारांकरिता पारदर्शक व सुलभ अशी इमारत आराखडा मंजुरी प्रस्ताव योजनाही असून, ड्रॉर्इंगनुसार इमारत आराखडा प्रस्तावाची बांधकाम नियमावलीनुसार स्वयंचलित छाननी प्रक्रिया पार पाडता येणार आहे. बांधकाम नकाशा मंजुरी प्रक्रिया व पूर्णत्वाच्या दाखल्याची प्रक्रिया जलदगतीने होणार असून, मंजुरी प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर संबंधितांना एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. नगररचना विभागाकडून स्थळ, भेटीची वेळ, दिनांकही एसएमएसद्वारे कळविली जाईल. सर्व प्रकारचे शुल्क (सुरक्षा अनामत, विकासनिधी) आदि आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर सदर कार्यप्रणाली कार्यान्वित होण्यास सहा महिन्यांचा अवधी जाणार आहे. (प्रतिनिधी)