कळवण : गेल्या बुधवारपासून सुरु झालेला नवरात्रोत्सव विजयादशमीपर्यंत चालणार असून या दरम्यान सप्तश्रृंगी देवी निवासनी ट्रस्ट व धार्मिक मंडळातर्फे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सातव्या माळेला भगवतीच्या दर्शनासाठी देवीभक्तांनी सप्तशृंग गडावर गर्दी केली असून एसटी २४ तास सेवा देत असल्यामुळे भाविकांना सप्तशृंग गडावर जाणे झाले सोपे झाले. मंगळवारी हजारो देवीभक्तांनी भगवती चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.सकाळी ७ वाजता श्री सप्तशृंगी देवीच्या अश्विन नवरात्र उत्सवातील सहाव्या माळेची महापूजा सहाय्यक विभागीय आयुक्त दिलीप स्वामी, सप्तशृंग गड ग्रामपंचायत सदस्य धनेश गायकवाड यांनी सपत्नीक केली. श्री भगवतीचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टेडीयन प्रकाश पगार , जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर आदी उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. संदीप दराडे, अतिरिक्त जिल्हा अधीक्षक सचीन गुंजाळ यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.महापूजेच्या तत्पूर्वी ट्रस्टच्या कार्यालयात देवीच्या दागिन्यांचे ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्रात पुजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वा. देवीच्या दागिन्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीचा अभिषेक होऊन देवीला शालू नेसवून मुकुट, कमरपट्टा, पावले, मंगळसूत्र, मोहनमाळ आदी दागिने चढविण्यात आले. त्यानंतर पंचामृत महापुजा व आरती झाली.दरम्यान सप्तशृंग गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याने देवीभक्त एसटीतून प्रवास करण्यास पसंती देत आहेत. पोलीस यंत्रणेने राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांसह नेतेमंडळीच्या व्हीआयपी गाड्याड्या सप्तशृंग गडावर जाण्यास मज्जाव केला असल्याने अनेकांनी एसटीचा आसरा घेतला. गडावर देवीच्या दर्शनासाठी १०० हून अधिक जादा बस जिल्ह्यातून आल्या असून राज्य परिवहन महामंडळाने नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यातून २२८ जादा बसचे नियोजन केले आहे.साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक सप्तशृंग गडावर येतात. त्यामुळे एसटीने याअगोदरच दरवर्षीप्रमाणे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी २०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. नाशिक येथून मोठ्या प्रमाणात जुने सीबीएस येथून सदर बसेस सोडण्यात येत आहेत. नाशिकरोडवरुनही काही बसेसची व्यवस्था करण्यात आली असून थेट गडावर जाणाºया बसेसला भाविक प्राधान्य देत असल्याने त्या दृष्टीने नियोजन केले आहे. एसटीने गडाच्या पायथ्याशी तात्पुरते बस स्थानक उभे केले असून तेथून भाविकांना जाण्यासाठी ६० बसेस धावत आहेत. नवरात्रोत्सव काळात गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी असल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने मालेगाव, मनमाड, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, सटाणा येथूनही जादा बस सोडण्याचे नियोजन केले असून त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. एसटीने २४ तास सेवा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविकांना सप्तशृंग गडावर जाणे आता सोपे झाले आहे.
सप्तशृंग गडावर भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 6:40 PM
कळवण : गेल्या बुधवारपासून सुरु झालेला नवरात्रोत्सव विजयादशमीपर्यंत चालणार असून या दरम्यान सप्तश्रृंगी देवी निवासनी ट्रस्ट व धार्मिक मंडळातर्फे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सातव्या माळेला भगवतीच्या दर्शनासाठी देवीभक्तांनी सप्तशृंग गडावर गर्दी केली असून एसटी २४ तास सेवा देत असल्यामुळे भाविकांना सप्तशृंग गडावर जाणे झाले सोपे झाले. मंगळवारी हजारो देवीभक्तांनी भगवती चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
ठळक मुद्देसातवी माळ : भाविकांना एसटीची आता २४ तास सेवा