धोंडगव्हाणच्या वाडीतील भाविक गडाकडे पायी रवाना
By admin | Published: August 4, 2015 11:10 PM2015-08-04T23:10:26+5:302015-08-04T23:11:04+5:30
महिलांचा सहभाग : पावसासाठी देवीला घालणार साकडे
पांडाणे : आषाढ महिन्यानिमित्त धोंडगव्हाणच्या वाडी येथील शेकडो महिला भाविकांनी देवी दर्शनासाठी मंगळवारी वणीगडाकडे प्रस्थान केले.
अनेक वर्षांपासून परिसरातील महिला आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहे. चांदवड तालुक्यातील घोंडगव्हाण गाव व धोंडगव्हाण वाडी येथील शेकडो महिला भाविक पावसाची तमा न बाळगता देवीच्या दर्शनाच्या ओढीने पन्नास किमीचा पायी प्रवास करतात. डोक्यावर तुळस घेऊन या
महिला वणीगडाकडे मार्गस्थ
झाल्या.
धोंडगव्हाण वाडीपासून सप्तशृंगदेवीच्या दर्शनासाठी आम्ही अनेक वर्षांपासून पायीवारी करत असल्याचे यमुनाबाई जाधव यांनी सांगितले, तसेच दर्शनानंतरच फराळ व उपवास सोडला जातो, असेही त्यांनी सांगितले. या वर्षात वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी, म्हणून देवीला साकडे घालणार आहे, अशीही या महिला भाविकांनी माहिती दिली.( वार्ताहर )