कळवणला शिवभक्तांनी घेतले मनोभावे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:23+5:302021-03-13T04:25:23+5:30
हर हर महादेवचा जयजयकार करत कळवण शहर व तालुक्यातील विविध महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
हर हर महादेवचा जयजयकार करत कळवण शहर व तालुक्यातील विविध महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील महादेव मंदिरे बंद ठेवण्यात आली होती . महादेव मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर, मंदिराच्या मंडपात पालखीमध्ये शंकराची मूर्ती ठेवून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविक दर्शन घेऊन कोरोनाचे संकट टळू दे असे साकडे देवाला घालत होते. तालुक्यात हेमांडपंथी शिवमंदिर असलेल्या मार्कंडपिंप्री ,देवळीकराड तसेच जागृत देवस्थान असलेले पाळे ,रामनगर ,कळवण ,मानूर ,सिद्धेश्वर , चणकापूर, जुनीबेज व शिरसमनी येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तानी दर्शन घेतले.
शिरसमणी येथे काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन केलेले दिसून आले. मंदिर प्रवेशद्वारावर मास्क शिवाय प्रवेश नाही असा दर्शनी फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. शिवाय प्रवेशद्वारावर सॅनिटायझर करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती. महाअभिषेकसह महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम मंदिर सभामंडपात साध्या पद्धतीने करण्यात आले.
मार्कंडपिंप्री येथील श्री भुवनेश्वर मंदिर परिसराची आठबे येथील अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला साफसफाई केल्यामुळे परिसर स्वच्छ होता. याठिकाणी साध्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कळवण शहरातील बेहडी व गिरणा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात कळवण व परिसरातील शिवभक्तांनी कोरोना सुरक्षिततेचे नियमांचे पालन करुन दर्शन घेतले.
फोटो - ११ कळवण शिरसमणी टेम्पल
शिरसमणी येथील काशीविश्वेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जमलेले शिवभक्त.
===Photopath===
110321\11nsk_19_11032021_13.jpg
===Caption===
फोटो - ११ कळवण शिरसमणी टेम्पल शिरसमणी येथील काशीविश्वेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जमलेले शिवभक्त.