नाशिक : काकडा आरतीपासून तर प्रवचन कथामालेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्र मांसह प्रख्यात डॉक्टरांचे विविध विषयांवर आरोग्याचा जागर करणारे व्याख्यान पार पडले. निमित्त होते, खोडेनगर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात पार पडलेल्या पंचदिन हरिनाम सोहळयाचे.वडाळा शिवारातील खोडेनगर येथील श्री विठ्ठल रुखमाई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पंचदिन हरिनाम सोहळ्यात जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तीचा जागर करण्यात आला. संगीतमय पुंडलिक चरित्र, विठ्ठल महात्म्य कथा हा विशेष धार्मिक कार्यक्र म पार पडला. पाच दिवस चाललेल्या या हरिनाम सोहळ्यात हभप चैतन्यमहाराज निंबोळे यांनी संतांचे अभंग आणि त्यातून केलेले जनप्रबोधन, एकनाथ महाराज परंपरा याविषयी प्रवचन दिले. यावर्षी ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. सुषमा भुतडा यांचे स्त्री रोग निवारण, डॉ. सागर मंडलिक यांचे हृदयरोग, मधुमेह, डॉ.जगदीश वाणी यांचे होमिओपॅथी समज व गैरसमज. डॉ.मुकेश मोरे यांचे कान नाक, घश्याचे आरोग्य विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा आलेली भाविकांना चांगला लाभ झाला. आरोग्यविषयक जागृती होण्यास मदत झाली.दरम्यान, मुक्ताताई सोनवणे, रामेश्वर महाजन महाराज, कृष्णा महाराज कामानकर, नीलेश पवार महाराज यांचे प्रतिदिन कीर्तन झाले. कीर्तनात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी कीर्तनकार, प्रमुख वक्ते यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुनील माधव खोडे व संगीता खोडे यांनी केले. विठ्ठल मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनी दिंडी व महाप्रसाद वाटप अन काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.विठुरायाच्या जयघोषात निघाली दिंडीपंचदिन हरिनाम सोहळ्याच्या सांगते प्रसंगी खोडेनगर डायमंड कॉलनी, विधातेनगर, स्टेट बँक कॉलोनी, रविशंकर मार्गे दिंडी काढण्यात आली. अग्रभागी सजविलेल्या रथात माऊलीची प्रतिमा होती. दिंडीत परिसरातील महिला तुलसी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. विविध अभंगातून भक्ती करत टाळकरी, विणेकरी यांनी यावेळी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीच्या समारोपनंतर महाप्रसाद वाटप मंदिराच्या आवारात करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
विठ्ठल मंदिरात भक्ती अन आरोग्याचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:15 PM
वडाळा शिवारातील खोडेनगर येथील श्री विठ्ठल रुखमाई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पंचदिन हरिनाम सोहळ्यात जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत विठुरायाच्या भक्तीचा जागर करण्यात आला
ठळक मुद्देप्रख्यात डॉक्टरांचे विविध विषयांवर आरोग्याचा जागरविठुरायाच्या भक्तीचा जागर करण्यात आलाआरोग्य विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते