अटक केलेला श्रीरामपूर येथील आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर औरंगाबाद येथे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात नांदूर नाका येथे शहीद खैरनार पेट्रोल पंप बाहेर नांदूर नाका येथे राहणाऱ्या विश्वास भीमराव जाधव यांनी ट्रक उभे केले असता अज्ञात चोरट्यांनी डिझेल टाकीचे झाकण व सेन्सर तोडून बावीस हजार रुपये लिटर किमतीचे सव्वादोनशे लिटर डिझेल चोरून नेले होते. याप्रकरणाचा पोलीस तपास करत असताना पोलीस कर्मचारी विजयकुमार सूर्यवंशी यांना डिझेल चोरी करणाऱ्या टोळीची गुप्त माहिती मिळाली डिझेल चोरणारी टोळी मेडिकल फाटा या ठिकाणी येणार याची खात्री झाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर भास्कर वाढवणे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, विश्वास साबळे, देवानंद मोरे, चालक गांगुर्डे यांनी आडगाव मेडिकल चौफुली येथे सापळा लावून मिळालेल्या माहितीवरून इंडिगो कार क्रमांक (एमएच ०६ ए झेड२३०१) गाडीसह अहमदनगर जिल्ह्यातील चंद्रबहादूर भीमबहादूर सोनार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यास अटक केली त्याने अन्य साथीदारांमार्फत डिझेल चोरी केल्याचे स्पष्ट केल्याने हिरावाडी जोशी वाडा येथे राहणाऱ्या त्याचा साथीदार सागर दत्तात्रय गरड याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वा दोनशे लिटर डिझेल प्लॅस्टिकची नळी, लोखंडी पकड, स्क्रू ड्रायव्हर व एक सिलव्हर रंगाची इंडिगो असा सव्वालाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डिझेल चोरणारे मुद्देमालासह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:17 AM