वेगवेगळ्या स्तरावर मतदारजागृती

By admin | Published: October 15, 2014 12:52 AM2014-10-15T00:52:53+5:302014-10-15T00:53:29+5:30

वेगवेगळ्या स्तरावर मतदारजागृती

At different levels, public awareness | वेगवेगळ्या स्तरावर मतदारजागृती

वेगवेगळ्या स्तरावर मतदारजागृती

Next

नाशिक : बुधवारी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकटीकरणासाठी योगदान द्यावे याकरिता वेगवेगळ्या स्तरावर मतदारजागृती केली जात असून, फ्रेंड्स सर्कलनेही ‘मतदान करा आणि सवलतीत ‘छापा-काटा’ या नाटकाचे तिकीट मिळवा’, अशी योजना आखत मतदारांना आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारजागृती करण्यात आली होती. परिणामी मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली होती. या मतदारजागृतीत काही व्यावसायिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतानाच त्यांना वस्तूखरेदीत सवलत देण्याच्या योजना आखण्यात आल्या होत्या. त्यावेळी नाशिकरोड येथील एका औषध विक्रेत्याने औषधांच्या किंमतीत दहा टक्के सवलत दिली होती, तर एका नामांकित हॉस्पिटलने वैद्यकीय तपासण्यांच्या शुल्कामध्ये सवलत जाहीर केली होती. आता विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत असून, जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासकीय पातळीवर आणि व्यावसायिक स्तरावरही मतदारजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. नाट्यव्यवसायातील फे्रंड्स सर्कल या संस्थेने येत्या रविवारी मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी कालिदास कलामंदिरात मायलेकीच्या नात्याची कथा आणि व्यथा सांगणारे ‘छापा-काटा’ हे नाटक आयोजित केले आहे. बुधवारी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी फ्रेंड्स सर्कलने योजना आखली असून, मतदान करणाऱ्या नागरिकाने बोटावरील शाई दाखविल्यानंतर त्याला तिकिटाच्या किमतीत तब्बल शंभर रुपयांची सवलत दिली जाणार आहे. एका दिवसासाठीच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे फ्रेंड्स सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले. मतदानाच्या दिवशी सवलतीत तिकीट प्राप्त करा आणि मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्राच्या सत्तेचा छापा-काटा झाल्यानंतर सायंकाळी निवांत मनाने मुक्ता बर्वे निर्मित व अभिनित ‘छापा-काटा’ हे कौटुंबिक हृदयस्पर्शी नाटक पहा, अशी ही योजना असून, यानिमित्ताने मतदारजागृतीही होईल आणि नाटकापासून दुरावलेल्या प्रेक्षकांना पुन्हा नाट्यगृहाकडे खेचून आणण्याचा प्रयत्नही होत आहे.

Web Title: At different levels, public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.