ठळक मुद्देचिमुकल्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीते, शिवबा राजा बसला घोड्यावर ,लावणी नृत्य लोकगीते, व त्याचबरोबर देशात होत असलेल्या कोरोना व्हायरस बद्दलची जनजागृती नाटिका आकर्षणच ठरली.
शालेय व्यवस्थापन समती अध्यक्ष हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाघाटन झाले. कासारी केंद्रप्रमुख हरिश्चंद्र जगधने अध्यक्षस्थानी होते. पोही,कसाबखेझ गावचे सरपंच तुळशीराम चव्हाण, सदस्य भास्कर राठोड, ,काळू राठोड, निलेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.पोही शाळेत दरवर्षी या केंद्रातील उपक्र मशील शिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन देऊन गौरविले जाते. त्याच प्रमाणे यावर्षी देखील कासारी केंद्रातील उपक्र मशील शिक्षिका कविता रोकडे यांना स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कल्पना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रेमिसंग जाधव, पंकज जाधव व कासारी केंद्रातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन विजय तुरकुणे यांनी केले.