लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पिळकोस येथील शेतकरी दीपक खंडू पवार हे सकाळी त्यांच्या पांढरी मळ्यात मोटर चालू करण्यासाठी गेले असता मळ्यातील बागेतून बिबट्या व मादी हे दोघे अचानक बाहेर आले व त्यांच्या मोटारसायकलचा आवाज ऐकू आल्यावर त्यांच्या समोरून काटवन झाडीत खाली उतरून गेले. त्यावेळेस पवार यांची पाचावर धारण बसली होती.गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पिळकोस परिसरात बिबट्यानेदहशत माजवलेली असून, भादवण, पिळकोस शिवार तर कधी गिरणा नदी शिवार तर काही वेळेस गिरणा नदीवरील पिळकोस - बगडूपुलावर आता तर बिबट्या शेतकºयांना व पशुपालकांना दिवसाही दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक व शेतमजूर हे धास्तावले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. पाच ते सहा वर्षापासून मेंदर शिवारात बिबट्याचा संचार असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात शिवारातील कित्येक पशुपालकांच्या जनावरांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे.शिवारात बिबट्याचा वावर हा सततचा असल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे व हा परिसर कायमचा बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावा, अशी मागणी शांताराम जाधव, दुर्गेश सूर्यवंशी, सचिन वाघ, केवळ वाघ, प्रवीण जाधव, अमोल वाघ, दादाजी जाधव, बुधा जाधव, रवींद्र वाघ, राहुल सूर्यवंशी, साहेबराव आहेर, प्रभाकर जाधव, हेमंत जाधव, राहुल आहेर, मंगेश जाधव, बाबाजी वाघ, विलास सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी आदींनी केली आहे.पांढरी, मेंगदर, फांगदर, कसाड या शिवारात बिबट्या नेहमी वावरत असून, आजवर बिबट्याने या शिवारात पशुधनाचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे पशुपालक जेरीस आले आहेत. आता बिबट्या दिवसाही दिसत असल्याने भीती वाटू लागल्याने शेतमजूर कामाला येण्यास घाबरत आहेत.- उत्तम बारकू मोरे,शेतकरी, पिळकोस
पिळकोस शिवारात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 10:46 PM
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ठळक मुद्दे ग्रामस्थांमध्ये घबराट । पिंंजरा लावण्याची वनविभागाकडे मागणी