शालेय विद्यार्थ्यांसाठी अक्षरबंधतर्फे डिजिटल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:33+5:302021-05-22T04:13:33+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने घरातच बसून कंटाळलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अक्षरबंध फाउंडेशनतर्फे डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने घरातच बसून कंटाळलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अक्षरबंध फाउंडेशनतर्फे डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध राज्यस्तरीय डिजिटल स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धांमध्ये पहिल्या गटासाठी पहिली ते चौथी बालगीत गायन, दुसऱ्या गटासाठी पाचवी ते सातवी कथाकथन व तिसऱ्या गटासाठी आठवी ते दहावी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेसाठी अभिमान भारतीय असल्याचा, कारण मी यांना आदर्श मानतो, या पुस्तकाने दिली प्रेरणा विषय देण्यात आले असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या विषयाचा पाच ते सात मिनिटांचा व्हिडीओ बनवून ३१ मेपर्यंत पाठवायचा आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्पर्धकांना स्पर्धा प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे अक्षरबंध फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी स्पष्ट केले आहे.