नाशिक : ज्येष्ठ नागरिकांनाही संगणक व स्मार्टफोन वापरता यावे यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक इंग्रजी भाषेसह ‘व्हिडिओ कॉलिंग’ आणि सोशल मीडिया वापराविषयीचे प्रशिक्षण साक्षर आणि सुमागो इन्फोटेक या संस्थांनी दिले. अभियांत्रिकी दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी रविवारी (दि. १६) रविवार कारंजा येथे आयोजित कार्यशाळेत अभियांत्रिकीच्या तरुण विद्यार्थ्यांनी नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळया अॅप्ससोबतच नेट बँकिंग, विविध प्रकारच्या आॅनलाइन तिकिटांची बुकिंग आणि आॅनलाइन खरेदी याविषयीच्या डिजिटल तंत्रज्ञानाचेही धडे गिरवले.
ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल तंत्राचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:36 AM