डिजिटल एक्स-रे रिर्पोटिंग सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:33 PM2020-05-24T22:33:37+5:302020-05-24T22:35:24+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, हज हाउस व केबीएच विधि महाविद्यालयातील क्लिनिकमध्ये डिजिटल एक्स-रे रिर्पोर्टिंग सेवा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले यांनी दिली आहे.
मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, हज हाउस व केबीएच विधि महाविद्यालयातील क्लिनिकमध्ये डिजिटल एक्स-रे रिर्पोर्टिंग सेवा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले यांनी दिली आहे.
शहरातील हज हाउस व केबीएच विद्यालयातील क्लिनिकमध्ये ही सेवा सकाळी १० ते १२ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सुरू राहणार असून, सामान्य रुग्णालयात ती अखंडितपणे सुरू राहणार आहे. हज हाउसमध्ये डॉ. अजहर शेख, तर केबीएचमध्ये
डॉ. संजय धावणे यांच्या नियंत्रणाखाली कामकाज सुरू करण्यात आले आहे.
या प्रणालीमधून आॅनलाइन रिर्पोर्टिंग होणार असल्याने नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष टास्क फोर्समार्फत याचे निदान व उपचाराची योग्य दिशा मिळणार
आहे.
सामान्यत: फीव्हर क्लिनिकमधील व सामान्य रुग्णांचे ९५ टक्के निदान या डिजिटल एक्स-रेच्या माध्यमातून सूक्ष्म पद्धतीने होणार असल्याने कोरोना तपासणीवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी या तंत्राची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही डॉ. महाले यांनी सांगितले.