दिंडोरी : कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असून, त्याअनुषंगाने दिंडोरी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.शहरीभागाप्रमाणे आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यातदेखील पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, दिंडोरी शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने, संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकतादेखील समजावून सांगितली जात आहे.पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, बाळकृष्ण पजई, वाहतूक शाखेचे महेश कुमावत आदीसह पथक कारवाई करत आहे.
विनामास्क नागरिकांवर दिंडोरी पोलिसाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 7:41 PM
दिंडोरी : कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असून, त्याअनुषंगाने दिंडोरी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ठळक मुद्देविनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई