दिंडोरी तालुक्यात धरणातील पाणीसाठा खालावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:16+5:302021-06-19T04:10:16+5:30
लखमापूर : पावसाळा सुरू होऊनही दिंडोरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. तर तालुक्यातील ...
लखमापूर : पावसाळा सुरू होऊनही दिंडोरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. तर तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही दिवसेंदिवस घट होत असल्याने टंचाईची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिंडोरी तालुक्यात सर्वात जास्त धरणे आहेत. मागील वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कमी-अधिक पावसामुळे सर्वच धरणे १०० टक्के भरली नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा, शेतीसाठी आरक्षित पाणी, प्रत्येक हंगामातील रोटेशन यामुळे धरणांमध्ये पाणी साठा दिवसेंदिवस कमी कमी होत जातो. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला बळीराजाला पाणी टंचाई समस्येला तोंड द्यावे लागते.
यंदा रोहिणी नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यंदा भरपूर पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात केली. मात्र पावसाने सध्या दडी मारल्याने धरणाची पाण्याची पातळी अजून कमी होण्याचे चित्र आहे. पावसाळा जवळ आला की धरणांच्या पातळीत घट केली जाते व नवीन येणाऱ्या पाण्यासाठी जागा निर्माण केली जाते. त्यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.
इन्फो
तालुक्यातील धरणातील पाणीसाठा
पालखेड - ७.९८ टक्के
करंजवण - १५.४० टक्के
वाघाड - ३.०५ टक्के
पुणेगाव - ६.९५ टक्के
ओझरखेड- २५.७६ टक्के
तिसगाव : २.५१ टक्के
फोटो- १७ दिंडोरी डॅम
===Photopath===
170621\085817nsk_26_17062021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ दिंडोरी डॅम