पेठ -आदिवासी भागातील दर्याखोर्यात राहून स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलणाऱ्या विद्यार्थ्यांचे हात बळकट करण्यासाठी येथीलयशादीप सर्वांगिण विकास सेवा संस्था पेठ यांच्या सहकार्याने मोफत विद्याव्रती अभ्यासिकेचा शुभारंभ करण्यात आला.पेठ सारख्या भागात शिक्षण घेऊन केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत जिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणाºया डॉ.योगेश भरसट यांच्या संकल्पनेतून आदिवासी युवकांना संधी मिळावी यासाठी पेठ येथे मोफत विद्याव्रती अभ्यासिका सुरू करण्यात आली. यशोदिप सर्वांगीण विकास सेवा संस्थेने स्पर्धा परीक्षा पुस्तके व आवश्यक फर्निचर भेट दिले. सोशल नेटवर्किंग फोरमने वर्तमानपत्र सुरू करून दिले आहे. गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांच्या हस्ते अभ्यासिका फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी यशोदिपचे अध्यक्ष गिरीश गावीत, रमेश चौधरी यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी युवकांच्या ज्ञान वाढीसाठी यशाचा दिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:31 PM