येमकोच्या संचालकांचा जिल्हा बँकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:47+5:302021-05-18T04:16:47+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखा क्रमांक ११ मध्ये येमको बँकेचे चालू खाते व मुदत ठेव खाते असून त्यात ...

The directors of Yemco sit in the District Bank | येमकोच्या संचालकांचा जिल्हा बँकेत ठिय्या

येमकोच्या संचालकांचा जिल्हा बँकेत ठिय्या

Next

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखा क्रमांक ११ मध्ये येमको बँकेचे चालू खाते व मुदत ठेव खाते असून त्यात सुमारे एकवीस कोटींच्या ठेवी आहेत. येमको बँकेच्या दैनंदिन व्यवहारासाठी अडीच कोटी रुपयांचा धनादेश बँक व्यवस्थापनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा केला होता. मात्र, रक्कम नसल्याचे कारण देत सदर धनादेश वटवू शकत नसल्याचे जिल्हा बँक शाखेच्या व्यवस्थापनाने सांगितले.

यावर येवला मर्चंट बँकेचे चेअरमन अरुण काळे, व्हाईस चेअरमन सूरज पटणी, संचालक नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, मनोज दिवटे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरकर, व्यवस्थापक जोशी आणि बँकेचे कर्मचारी यांनी, एकतर आम्हाला रक्कम द्या, नाहीतर लिखित स्वरूपात मेमो तरी द्या, अशी मागणी लावून धरत जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून टप्प्या-टप्प्याने रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हा बँक शाखा अधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: The directors of Yemco sit in the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.