जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखा क्रमांक ११ मध्ये येमको बँकेचे चालू खाते व मुदत ठेव खाते असून त्यात सुमारे एकवीस कोटींच्या ठेवी आहेत. येमको बँकेच्या दैनंदिन व्यवहारासाठी अडीच कोटी रुपयांचा धनादेश बँक व्यवस्थापनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा केला होता. मात्र, रक्कम नसल्याचे कारण देत सदर धनादेश वटवू शकत नसल्याचे जिल्हा बँक शाखेच्या व्यवस्थापनाने सांगितले.
यावर येवला मर्चंट बँकेचे चेअरमन अरुण काळे, व्हाईस चेअरमन सूरज पटणी, संचालक नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, मनोज दिवटे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरकर, व्यवस्थापक जोशी आणि बँकेचे कर्मचारी यांनी, एकतर आम्हाला रक्कम द्या, नाहीतर लिखित स्वरूपात मेमो तरी द्या, अशी मागणी लावून धरत जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून टप्प्या-टप्प्याने रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हा बँक शाखा अधिकाऱ्यांनी दिले.