प्रेस, टाकसांळच्या सर्व युनिटमधील महत्वपुर्ण विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:13 PM2018-09-27T18:13:11+5:302018-09-27T18:13:17+5:30

नाशिकरोड : अर्थ मंत्रालया अंतर्गत भारतातील प्रेस व टाकसांळ महामंडळातील भारतीय करन्सी अ‍ॅन्ड कॉईन कर्मचारी महासंघाच्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Discuss on the important issues in all units of press, pancake | प्रेस, टाकसांळच्या सर्व युनिटमधील महत्वपुर्ण विषयांवर चर्चा

प्रेस, टाकसांळच्या सर्व युनिटमधील महत्वपुर्ण विषयांवर चर्चा

Next
ठळक मुद्देभारतीय करन्सी अ‍ॅन्ड कॉईन कर्मचारी महासंघाची नाशिरोड येथे बैठक

नाशिकरोड : अर्थ मंत्रालया अंतर्गत भारतातील प्रेस व टाकसांळ महामंडळातील भारतीय करन्सी अ‍ॅन्ड कॉईन कर्मचारी महासंघाच्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आयएसपी-सीएनपी स्टाफ युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीत भारतातील नऊ युनिटमधील पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या बैठकीचे उद्घाटन श्रमिक देवता विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन करण्यात आली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून महासंघाचे अध्यक्ष दशावरम, महासचिव सुनील त्यागी कार्याध्यक्ष एल.एन. मारू, पेंढारकर, आयएसपी-सीएनपी स्टाफ युनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत आहेर, सरचिटणीस सुनील शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या बैठकीत प्रत्येक युनिटमधील पे स्केल, इतर प्रश्न, समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला नोईडा, मुंबई, हैद्राबाद टाकसाळ, देवास हैद्राबाद प्रेस तसेच होशंगाबाद पेपर मिल या कारखान्यातील सर्व प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतल होता. स्वागत स्टाफ युनियनचे सरचिटणीस सुनील शिरसाठ व कार्याध्यक्ष अभिजीत आहेर यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी रवींद्र गोजरे, सोमनाथ पगार, रवी वैद्य, मनोज चिरूटकर, सुरेश बोराडे, गयाप्रसाद शर्मा, पी.एस. कविश्वर तसेच सुशांत दास, तरूण विश्वकर्मा, आर.सी. बोराडे, आर.एन. मिश्रा, राजेश चमोले, जे.बी. देशमुख, रावसाहेब रूपवते, श्रीमती इंदुमती तडाखे, दिलीप जायभावे, मधु गोळेसर, एम.जे. म्हात्रे, सुशील तिवारी आदि उपस्थित होते.

 

Web Title: Discuss on the important issues in all units of press, pancake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.