शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:15 AM2021-02-09T04:15:45+5:302021-02-09T04:15:45+5:30
यावेळी झालेल्या चर्चेत आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी शिक्षकांच्या फंडाच्या प्रलंबित बिलासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. भविष्य निर्वाह निधी फंडाच्या ...
यावेळी झालेल्या चर्चेत आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी शिक्षकांच्या फंडाच्या प्रलंबित बिलासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. भविष्य निर्वाह निधी फंडाच्या बिलांचा प्रश्न लवकर निकाली काढण्याचा आग्रह धरला. यावेळी म्हसकर यांनी अनेक फंडांची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांचे चार लिपिकांना काम विभागून देण्यात आले आहे. त्यामुळे आता फंडाच्या बिलांना दिरंगाई होणार नसल्याचे स्पष्ट केले. शासन स्तरावरून मागणीप्रमाणे पैसा मिळण्यासाठी विलंब होतो. तसेच काही तालुक्यांची पगार बिले तालुक्यावरून लवकर होत नाहीत. त्यामुळे पगार होण्यास विलंब होतो. सेवापुस्तक गहाळ झालेल्या शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येणार असून तशा प्रकारच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात येतील.
यावेळी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे ,लहांगे, कार्याध्यक्षरवींद्र लहारे, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र भोये, हरिश्चंद्र चौधरी, योगेश गवारी यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यानी समाधान व्यक्त केले.
-----------------------------
शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना निवेदन देतांना निवृत्ती तळपाडे, हरिश्चंद्र भोये,हरिश्चंद्र चौधरी,योगेश गवारी आदी. (०८ इगतपुरी)
===Photopath===
080221\08nsk_16_08022021_13.jpg
===Caption===
०८ इगतपुरी