पेठ - सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एम जे. एम कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालायामध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. सटाणा महाविद्यालयाचे प्रा. शांताराम गुंजाळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी जलअभ्यासक गोपीनाथ पाटील अध्यक्षस्थानी होते. मुलभूत विज्ञानात ननोमटेरीलच भविष्य हा परिषदेचा मुख्य विषय होता. प्रत्येकाने राष्ट्रीय मूल्य अंगीकारावी व विद्यार्थांनी विज्ञाननिष्ठ होऊन राष्ट्रीय मूल्य जोपासावी असे गुंजाळ सांगितले. जल अभ्यासक गोपीनाथ पाटील यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून पेठ तालुक्यात पावसाचे पाणी अडवले पाहिजे व यावर उपाययोजना सुचविल्या. प्रा डॉ दिपक तायडे यांनी या परिषदेचे समाजातील महत्त्व सांगून ननोमटेरीलच संशोधन होण्यास चालना या दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेद्वारा नक्की होण्यास मदत होईल असे सुचविले. याप्रसंगी संस्थेचे सचिव पदमाकर गवळी, प्राचार्य डॉ आर वाय बोरसे, औरंगाबाद विद्यापाठाचे डॉ एम के लांडे, डॉ एस जी शंकरवार, भेंडे महाविद्यालयाचे डॉ मधुकर नवगिरे, नंदुरबार महाविद्यालयाचे डॉ मनोहर पाटील, डॉ अनिल कुलकर्णी, आर वाय के महाविद्यालयाचे डॉ अशोक बोर्हाडे, एलव्हीएच महाविद्यालयाचे डॉ ठाणसिंग पवार आण िडॉ के एच कापडणीस उपस्थित होते . डॉ स्मिता चव्हान आणि रोहित निकम यांनी सूत्रसंचालन केले.
राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 1:16 PM