जि. प. शाळांमधील मुलींच्या घरांवर लावणार नावाच्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:17 AM2020-01-09T00:17:00+5:302020-01-09T00:17:16+5:30
नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ...
नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत सुमारे सव्वा लाखाहून अधिक मुलींच्या नावाच्या पाट्या येत्या २६ जानेवारीपर्यंत लावण्यात येणार आहेत.
‘लेकीचे नाव दारावर, स्री सन्मानाचा करूया जागर’ असे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात येवला तालुक्यातील महालखेडा या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून करण्यात आली आहे. स्रीभ्रूण हत्या, अन्याय अत्याचार, हुंडाबळी, मुला-मुलींमध्ये केला जाणार भेद, मुलींच्या हक्काच्या शिक्षणातून होणारी गळती, अशा मानवनिर्मित संकटातून लेक चोहोंबाजूंनी वेढली गेल्याने ते थांबविण्यासाठी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ तर तिची या साºया गोष्टींतून मुक्तता होणार असल्याचे हेरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ३२७९ शाळांमध्ये शिक्षण घेणाºया १,३५,८३१ विद्यार्थिनींच्या घरांवर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता व शाळेचे नाव लिहिलेली रंगीत पाटी लावण्यात येणार आहे. ही पाटी लावण्यामागे मुलींमध्ये कुटुंबाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे हादेखील प्रमुख हेतू असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सदरचा उपक्रम पूर्ण करावयाचा असल्याने २५ डिसेंबरपासून सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या असल्या तरी, मुलींची संख्या पाहता, सदरचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणाºया या उपक्रमाने मुलींच्या शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी नक्कीच मदत होईल. मुलींच्या जन्माचे स्वागत, सन्मान करणाºया या उपक्रमांमुळे मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मदत होईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षकांनी परिश्रम घ्यायला हवेत.
- डॉ. वैशाली वीर-झनकर, शिक्षणाधिकारी