उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:50 PM2018-12-09T18:50:56+5:302018-12-09T18:51:02+5:30

बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डीव्हीपी संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून, सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे गाळपास आलेल्या उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने वसाकास ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 Distressed by not giving a quote like sugarcane quote | उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम

Next
ठळक मुद्दे धाराशिव साखर कारखाना अध्यक्षांवर शेतकरी नाराज

लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डीव्हीपी संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून, सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला आहे. गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे गाळपास आलेल्या उसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने वसाकास ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
वसाकाच्या भाडेकरू संस्थेने म्हणजेच धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी गव्हाण पूजनाच्या दिवशी आपण इतर लगतच्या कारखान्याच्या तुलनेत उसाला एक रु पया जास्त भाव देऊ असे जाहीर केले होते. मात्र या घोषणेला एक महिना पूर्ण झाला असला तरी अद्याप २००० रु पयांपेक्षा जास्त भाव न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.
या उलट वसाकाशेजारील द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने २३७१ रु पये इतका भाव जाहीर केला असून, रोख स्वरूपात पेमेंट अदा करण्यास सुरुवात केली आहे. वसाका व द्वारकाधीश यांच्या पेमेंटमध्ये सुमारे ३७१ रु पयांची तफावत जाणवत असून, वसाका कारखाना हे उर्वरित पेमेंट कधी देणार याकडे ऊस पुरवठादार शेतकºयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
वसाकाने शुक्रवारपर्यंत सुमारे ४७,७६० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सुमारे ३३,७०० पोते साखर निर्माण केली आहे. सरासरी साखर उतारा ७.६४ टक्के इतका मिळाला आहे. वसाकाच्या व्यवस्थापन मंडळ हे सध्या तरी कार्यक्षेत्रातील उसाऐवजी गेटकेनचा ऊस गाळप करण्यात धन्यता मानत असून, कार्यक्षेत्रातील आजी, माजी संचालक ज्यांनी वसाकावर १०-१५ वर्ष सत्ता भोगली तेसुद्धा आपला ऊस तुटावा म्हणून वसाकात खेट्या घालीत आहेत. ज्याप्रमाणे वसाकाशेजारील द्वारकाधीश साखर कारखान्याने २३७१ रु पये प्रतिटन भाव दिला त्याचप्रमाणे वसाकानेसुध्दा जाहीर केल्याप्रमाणे ऊस भाव द्यावा व ज्यांनी या आधी ऊस पुरवठा केला असेल त्यांना उर्वरित पेमेंट अदा करावे, अशी मागणी ऊसपुरवठादार शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  Distressed by not giving a quote like sugarcane quote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.