इगतपुरी : येथे कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे निमित्त साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण करण्यात आले.घाटनदेवी माता मंदिर व चेकपोस्टवर गस्तीसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी, तहसील कर्मचारी,तपासणी पथक,डॉक्टर यांना सुरक्षितता बाळगता येईल यासाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तहसिलदार अर्चना पागीरे यांच्या उपस्थितीत हातमोज्यांचे वितरण करण्यात आले. तसेच महावितरणच्या कर्मचा-यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, राजेश परदेशी,अजित बाफना, आकाश खारके,अजित बाफना, आकाश खारके आदी उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:04 PM