नांदूरवैद्य : बेलगाव तऱ्हाळे येथे यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ, कृषी विज्ञान विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत निरजा ग्रुपच्या वतीने बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, पिंपळगाव घाडगा, भरवीर खुर्द येथील बचत गटातील महिला व ग्रामस्थांना बियाण्यांचे कीट, शेंगा सोलणी यंत्र, तसेच विविध प्रकारच्या भाज्या, पपईचे रोपटे तसेत परसबाग कीटचे वाटप यशवंत चव्हाण विद्यापीठ कृषी विभागाचे प्रमुख हेमराज रजपूत व निरजा ग्रुपचे प्रमुख संग्राम बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपळगाव घाडगा येथे किशोरवयीन २५ मुलींना लाल तांदूळ आणि शेवगा पावडर देण्यात आली. घाडगा, भरविर खुर्द आणि बेलगाव तऱ्हाळे येथील आदिवासींच्या २५ कुटुंबांना परस बागेचे २० प्रकारच्या भाजीपाल्याच्या बियाण्यांचे कीट आणि प्रत्येकी एक पपईचे रोप देण्यात आले. भरवीर खुर्द येथील बाल भैरवनाथ बचत गटास शेंगा सोलणी यंत्र विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले. प्रास्ताविक सुखदा पाराशरे यांनी केले, तर सूत्रसंचालन साहित्यिक विजयकुमार कर्डक यांनी केले.