पेठ तालुक्यात जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:48 AM2020-12-07T00:48:33+5:302020-12-07T00:49:02+5:30
तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त जमीन आरोग्यपत्रिकांचे वाचन व वाटप करण्यात आले.
पेठ : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त जमीन आरोग्यपत्रिकांचे वाचन व वाटप करण्यात आले.
तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या दहा गावांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना जमीन सुधारणा व उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण देऊन माती परीक्षण करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तहसीलदार संदीप भोसले यांच्या उपस्थितीत करंजाळी येथे जमीन आरोग्यपत्रिकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, तहसीलदार संदीप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, वनराजचे अध्यक्ष यशवंत गावंडे, गोकुळ झिरवाळ, मंडल अधिकारी मुकेश महाजन, आंधळे, म्हसे, किरण कडलग, प्रीतिश कारे, मयूर तांबे, पद्माकर गवळी, सरपंच ज्ञानेस्वर गवळी, निवृत्ती वाघमारे, दिनकर गवळी, उमाजी बाराईत, पुंडलिक सहारे, पांडुरंग चारस्कर, हिरामण गवळी, मनोहर राऊत, त्रबक भुसारे, जगनाथ ठाकरे, विश्वास गवळी, विजय गवळी, देवराम गवळी, रामदास भोये आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.