घोटी : ग्रामपालिकेच्या वतीने ह्यएक मूठ पोषण आहारह्णअभियानाअंतर्गत कुपोषित बालकांसाठी २० अंगणवाड्यांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनू नये याकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात येत असून, घोटी ग्रामपालिकेच्या अंतर्गत २० अंगणवाडीमधील ३१५ तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांना शेंगदाणे, गूळ, मटकी, बटाटे, पॅराशूट तेल असे किट पोषण आहाराअंतर्गंत मुबलक प्रमाणात देण्यात आले. याप्रसंगी सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, गणेश गोडे, रवींद्र तारडे, संजय जाधव, श्रीकांत काळे, भास्कर जाखेरे, स्वाती कडू, अरुणा जाधव, रुपाली रूपवते, कोंड्याबाई बोटे, सुनीता घोटकर, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, सुनंदा घोटकर, अर्चना घाणे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे, हिरामण कडू, राजू जोशी आदी उपस्थित होते.