कळवण : कोरोनापासून जनतेचे रक्षण होण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या कळवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधवांना विघ्नहर्ता पतसंस्था व निवाणे येथील मोहन निंबाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. विघ्नहर्ता पतसंस्थेचे अध्यक्ष संदेश पगार व पाटील पतसंस्थेचे संस्थापक विनायक आहेर, अध्यक्ष भगवान आहेर, व्यवस्थापक सुरेश आहेर यांच्या हस्ते गणेशनगर भागात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, सामाजिक कार्यकर्ते दीपक पगार आदी उपस्थित होते.
कळवण येथे सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:09 PM