जिल्हा बँकेने ठेवींमधून वीज बिल भरण्याची करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:25 PM2021-03-31T23:25:32+5:302021-04-01T00:59:00+5:30
ब्राह्मणगाव : सद्या वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित वीज बिल वसुली सक्तीची करण्यात येत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक ग्राहकांच्या जिल्हा बँकेत ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवींमधून वीज बिल भरणा करून घेण्याची मागणी येथील सरपंच किरण मधुकर अहिरे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

सद्या एका बाजूला मार्च अखेर, दुसरीकडे कांदा मार्केट बंद, त्यातच कोरोनामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच कांदा मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत व बिल माफ होईल या भ्रामक समजुतीत सर्व राहिले पण आता वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली सक्तीची केली जात आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवीमधून वीज ग्राहकांच्या वीज बिल वसुली करून बँक व वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सहकार्य करण्याची मागणी सरपंच किरण अहिरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील दार बहिरम यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. या बाबतची लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे.