ब्राह्मणगाव : सद्या वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित वीज बिल वसुली सक्तीची करण्यात येत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक ग्राहकांच्या जिल्हा बँकेत ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवींमधून वीज बिल भरणा करून घेण्याची मागणी येथील सरपंच किरण मधुकर अहिरे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.सद्या एका बाजूला मार्च अखेर, दुसरीकडे कांदा मार्केट बंद, त्यातच कोरोनामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच कांदा मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत व बिल माफ होईल या भ्रामक समजुतीत सर्व राहिले पण आता वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली सक्तीची केली जात आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवीमधून वीज ग्राहकांच्या वीज बिल वसुली करून बँक व वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सहकार्य करण्याची मागणी सरपंच किरण अहिरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील दार बहिरम यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. या बाबतची लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे.
जिल्हा बँकेने ठेवींमधून वीज बिल भरण्याची करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:25 PM
ब्राह्मणगाव : सद्या वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित वीज बिल वसुली सक्तीची करण्यात येत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक ग्राहकांच्या जिल्हा बँकेत ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवींमधून वीज बिल भरणा करून घेण्याची मागणी येथील सरपंच किरण मधुकर अहिरे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
ठळक मुद्देकांदा मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत