नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमधील ९ हजार ९६३ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५३ कोटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ८७९ शेतक-यांना, तर दुस-या टप्प्यात ९०८३ शेतक-यांचा कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये समावेश झाला आहे.८७९ शेतक-यांपैकी ८३७ शेतक-यांच्या कर्जमाफीच्या खात्यात ३ कोटी ६० लाखांचा निधी जिल्हा बॅँकेच्या कर्जखात्यात जमा झाला आहे. दुस-या टप्प्यात राज्य शासनाकडून ९०८३ शेतक-यांच्या कर्जमाफीपोटी ३३ आणि १७ असे दोेन टप्प्यात सुमारे ५० कोेटी रुपये जिल्हा बॅँकेला प्राप्त झाले आहेत. आता ९०८३ शेतक-यांची नावे व आवश्यक ती माहिती तालुकास्तरीय समितीकडून तपासणी करून जिल्हा बॅँकेला प्राप्त झाल्यावर ही ५० कोटींची रक्कमही जिल्हा बॅँकेला कर्जखात्यात जमा करता येणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागणार आहे. आपलं सरकार पोर्टलवर ९०८३ शेतकºयांची यादी अपलोड झाल्यानंतर त्या शेतकºयांचे अहवाल तालुकास्तरीय समितीने पाठविल्यावर ५० कोटी रुपये संबंधित शेतकºयांच्या नावे वर्ग होऊन त्यांचे सातबारे कोरे होण्यास मुहूर्त लागणार आहे. जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याने आता नवीन अध्यक्ष होण्यास इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बॅँक : नऊ हजार नऊशे शेतक-यांच्या कर्जमाफीला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:18 PM
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमधील ९ हजार ९६३ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५३ कोटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ८७९ शेतक-यांना, तर दुस-या टप्प्यात ९०८३ शेतक-यांचा कर्जमाफीच्या ग्रीनलिस्टमध्ये समावेश झाला आहे.८७९ शेतक-यांपैकी ८३७ शेतक-यांच्या कर्जमाफीच्या खात्यात ३ कोटी ६० लाखांचा निधी जिल्हा ...
ठळक मुद्दे५३ कोटींची गंगाजळी जमा जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागणार