नांदूरवैद्य : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत प्रादेशिक लोकसंपर्कब्युरो, नाशिक यांच्या वतीने कोवीड 19 जनजागृती रथास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत जनजागृती कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले .इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथील शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांच्या कलापथकातून सुरक्षित शारीरिक अंतर, गृहविलगीकरण, आजाराचा कलंक लागू न देणे, आजाराशी संबंधित भ्रम, त्यावरील अडचणी व उपाययोजना, तज्ज्ञांच्या उपचारासंबंधी मार्गदर्शन संदेश, मास्क, सॅनिटायझरचा वापर याची बतावणीतून केलेल्या मार्मिक माहितीसह मानिसक आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत जनजागृती करण्यात येणार आहे. उद्घाटनपर कार्यक्र मानंतर पंचवटी, काळाराम मंदिर, गोदावरी घाट, दहीपुल, दुधबजार, गंजमाळ, शालिमार चौकात कार्यक्र माची सांगता करण्यात आली. तर भगूर, रेणुकामाता मंदीर, देवळाली कॅम्प, सोमवार बाजार चौक, संसरीगाव फाटा देवळाली गाव-गांधी चौक, अनुराधा थिएटर आदी ठिकाणी कार्यक्र म होणार असल्याची माहिती क्षेत्रिय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी दिली. एस. बी. मलखेडकर, सी. के. चांदुके आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.कोटकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात धार्मिक कार्यक्र म तसेच इतर शासकिय सांस्कृतिक जनजागृती कार्यक्र मांवर शासनाकडून बंदी घालण्यात आली होती. परंतू आज माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून जनजागृती रथाला हिरवा कंदील मिळाला. त्यांच्या हस्ते कार्यक्र माला सुरूवात झाल्याने दिलासा मिळाला.- शाहीर उत्तम गायकर, वाघेरे