टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याची सायगाव येथील जि. प. शाळेत कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:36 PM2019-10-05T21:36:47+5:302019-10-05T21:37:14+5:30

येवला : तालुक्यातील सायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.

District of Saigao for making durable goods from waste. W Workshops in school | टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याची सायगाव येथील जि. प. शाळेत कार्यशाळा

टाकाऊ पासून टिकाऊ बनविलेल्या वस्तू सह विद्यार्थी व शिक्षिका.

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी पळसाच्या पानापासून आकर्षक पत्रावळ्या ही बनवल्या.

येवला : तालुक्यातील सायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्र माचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयुर खैरनार यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कागदापासून तसेच आइस्क्र ीमच्या काड्यापासून घर, फोटो फ्रेम, मोबाईल स्टॅन्ड, फुलदाणी, पेन स्टँड यासारख्या विविध आकर्षक वस्तू बनवल्या. शालेय अभ्यासक्रमातील कार्यशिक्षण विषयाअंतर्गत उत्पादक उपक्र मांमध्ये विद्यार्थ्यांनी पळसाच्या पानापासून आकर्षक पत्रावळ्या ही बनवल्या.
या उपक्र मामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता मूल्य रु जवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी नविनर्मितीचा आनंद घेतला. सदर उपक्र मास मुख्याध्यापिका सोनाली दण्डगव्हान, उपशिक्षक नितीन गावित यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेमध्ये भरवण्यात आले. त्यास शाळा व्यवस्थापन समतिी सदस्य पालक व ग्रामस्थांनी भेट दिली. यावेळी सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपक्र म यशस्वीतेसाठी सर्व पालक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

 

Web Title: District of Saigao for making durable goods from waste. W Workshops in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.