औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरे हि मोठ्या प्रमाणात आहेत. पण अचानक बिबट्याच्या वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे सायंकाळी बिबट्याच्या धाकाने सातच्या आत घरात जावे लागत आहे. तरी वन विभागाने बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेमागील आठ दिवसापुर्वी तर साळी येथे विहिरीत बिबट्या पडला होता वन विभागाने तो बाहेर काढला परंतु तो पसार झाला. वनपरिक्षेत्र अतर्गत येणाऱ्या येथील गांवा जवडील कपाळे डोंगर व तर साळी मुंजवाड, औंदाणे गांवाला लागुन हती नदी आहे. येथे बिबट्याचा तीन चार वर्षापासुन वावर आहे. पिकांचा आसरा, मुबलक गुरांची संख्या अशी कारणे आहत.गावात व शेतात दररोज रात्री चार पाच दिवसापासुन रात्री वीज गायब होत असल्याने ग्रामस्थां मधे संताप व्यक्त केला जात आहे.दरवर्षी शेळया, मेंढया बळी द्याव्या लागत असल्याने येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काडावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.जर असत चालत राहील तर लवकरच बिबट्या आपले मोठे भक्ष करु ण ताव मारेल असे मत येथील रहिवाश्यांचे मत आहे. जर यावर खबरदारीचे उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालवे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकऱ्यांनी केले आहे.येथील परिसरात रात्री बारा बारा तास विज गायब होत असल्याने बिबट्या अंधाराचा फायदा घेत गांवात व रस्त्यावर मुक्त फिरत आहे व रात्री बिबट्याचे घरासमोरील शेतात दर्शन झाले त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभाग व विज कंपनीने लक्ष घालावे.- यशोधन निकम, रहिवाशी, औदाणे.
औंदाणे परिसरात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 7:07 PM
औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे.
ठळक मुद्देचार दिवसांपासून ग्रामस्त भयभीत; पशुधन धोक्यात