एकलहरे : सिद्धार्थनगर, हनुमाननगर, सामनगाव झोपडपट्टी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिलांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एकलहरे गेट नंबर दोन ते चेमरी नंबर एकचा बस स्टॉप या परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, पेट्रोलपंप परिसर येथे सुमारे १५ ते २० मोकाट कुत्रे झुंडीने फिरतात. वाहनधारकांच्या मागे हे कुत्रे लागत असल्याने दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडते. कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी वाहनधारक लांबून दुसऱ्या मार्गाने ये-जा करत आहे. पंधरा दिवसांपासून अचानक हे कुत्रे आले कोठून, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे रहिवासी व महिला रस्त्याने एकटे जाणे टाळू लागले आहेत. यामुळे विद्यार्थी व कामगार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. झाडाझुडपाच्या ठिकाणी मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयास सहसा दिसून येत नाही. त्यामुळे येणाºया जाणाºयांच्या मागे अचानक मोकाट कुत्रे लागत असल्याने रहिवासी व महिलांची तारांबळ उडत आहे. मनपा हद्दीत पकडलेले मोकाट कुत्रे बाहेर आणून सोडले जात असल्याने त्याचा त्रास एकलहरे परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात हद्दीबाहेर आणून सोडू नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.गेल्या १५ दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची झुंड ही दुचाकी, चारचाकी व पादचाºयांच्या मागे लागत असल्याने तारांबळ उडून वाहन घसरून अपघात होत आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे रहिवासी येण्या-जाण्याचा मार्ग बदलुन जात आहे. मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे. - अशोक परोळसांधे, किराणा दुकानदार
सिद्धार्थनगर, सामनगाव परिसरात कुत्र्यांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:27 AM