कुत्रे आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:54 PM2020-12-29T17:54:25+5:302020-12-29T17:56:02+5:30
सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून नदीपात्रात कोसळल्याची घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नालासोपाारा येथील पाच मित्र मारझो कार (क्र. एम. एच. ४८ बी. टी. १४१३) ने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतांना सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर सदर अपघात झाला. देवनदीच्या पुलावरुन कार जात असतांना अचानक कुत्रे आडवे आले. कारचालकाने कुत्र्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कार देवनदीच्या पुलाला धडकून लोखंडी कठडे तोडून देवनदीच्या पात्रात कोसळली. सुमारे २० फुट खोल नदीपात्रावर कार खडकावर आदळल्याने मोठा आवाज झाला. नदीला पाणी कमी झाल्याने खडकावर कार आदळून मोठा आवाज आला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी धाव घेऊन मदतकार्य केले.
वावी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कारमध्ये अडकलेल्या एका जखमीला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कार चालक साहील अनिल ब्रीद (२४) रा. नालासोपारा हा जागीच ठार झाला तर अनिषेक शुक्ला (२५) रा. जयंत नक्ती (२४) रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, सतिष बैरागी अधिक तपास करीत आहेत.