दोनवाडेला बिबट्याने घेतला बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:32 AM2020-05-03T01:32:50+5:302020-05-03T01:33:04+5:30
देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शुक्रवार (दि.१) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घराच्या ओट्यावर खेळत असलेला रुद्रावर लगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्याने हल्ला करून त्याला उसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी रुद्राच्या आवाजाने आईवडील घराबाहेर आले असता त्यांना बिबट्या शेतात जाताना दिसला त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून गेले तोपर्यंत बिबट्याने त्याच्या मानेचा व चेहराचा लचका तोडला होता. नागरिकांच्या आवाजाने बिबट्या पसार झाला. नागरिकांनी रुद्र यास तातडीने देवळाली कॅम्प विजयनगर भागातील गुरव हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तपासणी अंति डॉ. गुरव यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
यावेळी उपस्थित नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला, तर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, राहुल मोरे यांनी घटनास्थळी देऊन पंचनामा केला. वनविभागाने पिंजरा लावून ड्रोन मशीनद्वारे पाहणी केली.
या परिसरात अशा घटना मार्च ते मेच्या दरम्यान घडत असून, याबाबत वनविभागाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे माजी सरपंच अशोक ठुबे यांनी सांगितले.